द्वंद्व


                                   "द्वंद्व"                                                                  तो तसा वागला म्हणून मी असा वागलो तर मग बिघडलं कुठे? सगळं बरोबर तर झालं . खरतर भिघडल कुणाचं काहीही नाही आणि कुणावाचून कुणाचं अडलं पण  नाही, उलट क्रिया- प्रातिक्रियेचा नियम पूर्ण झाला.  वास्तविक बघता हिशोब पण चुकता झाला.वर वर होणारा वाद पण मिटला .  पण खरी गम्मत अशी आहेकी खरे द्वंद्व आता सुरू झाले.. एकमेकांच्या मनात ... एकमेकांबद्दल'.... स्वतःच्या मनाची स्वतःच्या मनाशी... जिंकणार कोण ? खरतर प्रश्न इथेच संपायला हवा होता, मात्र यात अजून एक चांगला मुद्दाआहे तो म्हणजे एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल अजूनही प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा, अपेक्षा, जिवन्त आहे अस मनायला हरकत नाही. मग चुकलं कुठे? कुणाचं? त्याच? की माज? मग यातून सार्थकी काय लागले? त्याची जिरली की? मग त्याच्यासोबत मीही माज्या बलस्थानाची दुखरी बाजू वर आणून ठेवली , नक्की काय?

                   मला माझ्या चुकीच्या वागण्याची  जाणीव झाली, याची जाणीव समोरच्याला ही झाली आणि माज्या ह्या अश्या वागण्याचा पश्चाताप मलाही ही होतो. हेही त्याला उमजते आणि याच एका कारणामुळे तो माज्या नजरेत मोठा झालाय,मात्र मी जसा वागलो, आणि कुणी आपल्यासोबत असे वागले, तर कसा त्रास होतो ह्याची जाणीव करून देण्यासाठी समोरचा व्यक्ती जर वागत असेल तर, तो कदाचित काहीतरी गामावतोय, काहीतरी महत्वाचे गमावतोय, याची त्याला जाणीव असून ही केवळ आणि केवळ त्याला त्याच्या दुःखाची जाणीव मलाही  व्हावी याचकरीत तो वागत असेल तर, तो काय गमावतोय याची जाणीव त्यालाही नाही असाच म्हणावे लागेल.
                    आपण केलेल्या चुकांची जाणीव जेव्हा आपल्याला असते आणि याची जाणीव समोरच्या लाही असते तेव्हा समोरच्या व्यक्तीबद्दल जो आदरभाव, दरारा, आपल्या मनात असतो तो समोरच्यानि सुरू केलेल्या "टिट फॉर टॅट" अश्या खळ खेळून झाल्यावर  कुठेतरी आपोआप संपून जातो.  तोव्यक्ती आपल्या नजरेतून पडायला लागतो कारण मुद्दा असतो तो म्हणजे मी जसा वागलो तसा तो ही वागला तर दोघांमध्ये उरणारा फरक कुठाय? जो फरक एकमेकांच्या नजरेत एकमेकांना जिव्हाळा प्रेम आणि आदर निर्माण करून देतो . तो फरक कुठेय?आणि मग सुरू होते ते द्वंद्व ...

                    त्या एकमेकांच्या वागण्यामुळे एकमेकांवर ओढवलेल्या परिस्थितीवर निश्चयाने, चूरशीने मात करण्याचे.आहे त्या नात्यात दारार निर्माण करून ,मला किती त्रास झाला याची जाणीव समोरच्या व्यक्तीला करून देण्याचा प्रयत्न करतो ,मग या युद्धात सर्व गुन्हे माफ . मग हे युद्ध जिंकण्यासाठी आपण तो जसा आपल्यासोबत वागला होता तशेच आपण वर्तमानात आपल्या जिवाभावाच्या लोकांसोबत, प्रियजनासोबत वागतो आणि अगोदरच्याला धडा शिकवण्याच्या नादात आपण आपल्या प्रियजनांच्या मनात शत्रू म्हणून उदयास येतो ... तोच शत्रू ज्याला आपण अगोदर धडा शिकवण्याचा संकल्प केला होतो .एवढं सगळं होऊन ही दोघांमधला फरक कुठे सापडला? नाही ना.... मग आपण फक्त एवढंच ठरवावं आपण ज्या वाटेवरून गेलो त्या वाटेवरून इतरांना जाण्याची वेळ येऊ नाही आणि त्या वाटेवर जाण्यासाठी आपल्यामुळे कुणी प्रवृत्त होनार नाही बास एवढंच एक केविलवाणा प्रयत्न  करावा आणि दोघांमधला फरक सापडला नाही तर आपला आपण शोधवा आणि इतरांची जिरवण्यापेक्षा आपण आपल्या मनात पेटलेल्या द्वंदाची आग विझवावी.
                       आणि संपवावे एकदाचे ते "द्वंद्व".
                           -नितिन हातमोडे
                                                     
 

Comments

  1. अप्रतिम लिहल सर, प्रत्येकाला लागु होते, सत्य आहे सर, तुम्ही सांगितल तस झाल पाहिजे, याची सुरवात मी माझ्या पासून करत अहो,

    ReplyDelete
  2. खूप छान नितीन

    ReplyDelete
  3. अप्रतीप नितीन सर..काही तरी चूक सुधारायची कशी याच चांगल्या शब्दात सादरीकरण

    ReplyDelete
  4. खूप सुंदर लेखन सर.

    ReplyDelete
  5. Khup bhari likhan krto re Tu. Mla mahit navhat Tu writer pn aahe mhanun. Khup chhan lihalas. Lihit raha...

    ReplyDelete
  6. अर्थपूर्ण मार्गदर्शन आहे....असच लिखाण तुझ्या प्रीतिभेतून येईल हीच आशा..☺️

    ReplyDelete
  7. अप्रतिम लिखाण आणि अप्रतिम विचार..👍👌

    ReplyDelete
  8. अप्रतिम लिखाण आणि अप्रतिम विचार👍👌

    ReplyDelete
  9. पुढल्या आर्टिकल च्या प्रतीक्षेत🙏😘

    ReplyDelete
    Replies
    1. Next artical about "sorry" ya topick vr asnar ahe

      Delete

Post a Comment